अहमदनगर

नगर : कोपरगावातील रस्त्यांसाठी तीन कोटी मंजूर

अमृता चौगुले

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ग्रामविकास मंत्रालयाने तीन कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.

तीन कोटी निधीतून जवळपास 28 गावातील रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शहाजापूर येथील साहेबराव कोळपे घर ते गणपती मंदिर देशमुख वस्ती, मढी बु. रा. मा. 7 ते युसूफ पठाण (पठाणवाडी रस्ता), चांदगव्हाण इ.जी.मा. 160 (धुळबाबा) ते विलास शिंदे घर, मुर्शतपूर इ. जी. मा. 160 मुर्शतपूर मंडपीनाला ते प्र. जी. मा. 8 ला मिळणारा रस्ता, डाउच बु. जि. प. शाळा ते काशीनाथ दहे (डाऊच खुर्द) गावाकडे जाणारा रस्ता, बहादराबाद दत्तवाडी परिसर ते म्हसोबा मंदिर रस्ता, देर्डे-कोर्‍हाळे मढी फाटा ते भगवान होन घर रस्ता यांचा त्यात समावेशआहे.

अनेक ठिकाणी नवी कामे

मढी खु. अण्णा आभाळे घर ते उंबरी नाला रस्ता, देर्डे चांदवड शांताराम मेहेत्रे वस्ती ते नंदू कोल्हे वस्ती रस्ता, पोहेगाव नंदकिशोर औताडे घर ते शुभम औताडे घर रस्ता, धामोरी विश्वास जाधववस्ती ते माधवराव जगझाप वस्ती रस्ता, धामोरी ग्रा. मा. 1 भास्कर मांजरे शेती ते दत्तू वाघ वस्ती रस्ता, धामोरी ग्रा. मा. 1 नारायण मांजरे शेती ते दिलीप जगझाप शेती (तालुका हद्द) रस्ता, सुरेगाव निकम वस्ती ते जुने गावठाण रस्ता, मंजूर रा. मा. 7 मंजूर कमान ते वालझाडे वस्ती रस्ता, पढेगाव भास्कर म्हस्के घर ते दत्तू शिंदे घर रस्ता, तिळवणी पगारे वस्ती पुंडलिक चक्के घर (जिल्हा हद्द) रस्ता, कासली गायकवाड वस्ती ते जमधडे वस्ती (कासली शिरसगाव शिव रस्ता), पढेगाव म्हसोबा मंदिर ते जुना कालवा (पढेगाव-संवत्सर शिव रस्ता) या रस्त्याची कामेही होणार आहेत.

सडे बसस्थानक ते सतीश बाराहाते घर रस्ता, धनगरवाडी बाबुराव गुंजाळ यांचे बरवापासून ते सुनील रक्टे घर रस्ता, चितळी येथील राहाता-चितळी रोड ते प्रसाद साळवे घर, वाकडी महादेव मंदिर ते सोपान जाधव घर, पुणतांबा सप्तशृंगी मंदिर ते साहेबराव शिंदे घर, संवत्सर कर्पे वस्ती ते लोहकणे वस्ती रस्ता, देर्डे – कोर्‍हाळे भगवान होन घर ते पवार वस्ती रस्ता या रस्त्यांना प्रत्येकी 10 लाख निधीतून खडीकरण करण्यात येणार आहे व घोयगाव नागपूर हायवे ते घोयेगाव गावापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, तसेच धोत्रे नारायण मिसाळ घर ते सयाजी माळवदे घर (लाख रस्ता) या रस्त्यांना 20 लाख निधीतून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी मतदारसंघातील ग्रामीण भागातील नागरिकांची मागणी होती. त्याची दखल घेऊन ना. काळे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध भागातील नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे अभिनंदन केले आहे.

रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला

अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यांसाठी निधी देऊन या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, अशी या गावातील नागरिकांची मागणी होती. त्यांच्या मागणीची दखल घेवून रस्त्यांसाठी निधी उपलब्ध केला आहे.

– ना. आशुतोष काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT