अहमदनगर

नगर : केडगाव औद्योगिक वसाहतीत घाणीचे सम्राज्य

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : केडगाव औद्योगिक वसाहतीत मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची झालेली दुरावस्था, रस्त्यावरून मैलामिश्रिम पाणी वाहत आहे. पथदिवे बंद पडल्याने दररोज रात्री पसरत असलेले अंधाराचे साम्राज्य असते. महापालिका आणि राज्य सरकारचे कर व जीएसटी मिळून तब्बल 126 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. कराच्या मोबदल्यात किमान सोयी सुविधा तरी उपलब्ध करून द्या, अशी मागणी उद्योजकांनी महापालिकेकडे केली.

महापालिका हद्दीत असणार्‍या केडगाव औद्योगिक वसाहतीतील विविध समस्यांची उपमहापौर गणेश भोसले यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी उद्योजकांनी आपल्या समस्या, अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, केडगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सतीश बोरा, व्हा. चेअरमन नितीन पटवा, संतोष बोथरा, मेहूल भंडारी, अरविंद गुंदेचा, अजित कर्नावट, सुमित मुनोत, अरुण झंवर, रविंद्र गांधी, दीपक मुनोत, संदीप देसरडा, अमृत मुथियान, प्रतिक फिरोदिया, दिनेश गुगळे, नीलेश गुगळे, संजय राका, बाळू गुगळे, प्रमोद बोगा, रुपेश बरमेचा आदी उपस्थित होते.

केडगाव औद्योगिक वसाहतीत अनेक वर्षांपासून विविध समस्या प्रलंबित आहेत. अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. त्यातच ड्रेनेजलाईनचे मैलामिश्रीत पाणी रस्त्यांवरुन वाहत आहे. रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. रस्त्यावरील अनेक दिवे बंद पडले आहेत. त्यामुळे परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य असते. मध्यंतरी परिसरात ड्रेनेजलाईनचे काम झाले मात्र केवळ चेंबर बसवले आणि पाईप टाकलेच नाहीत. त्यामुळे ड्रेनजच्या पाण्याचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे, अशा समस्यांचा उद्योजकांनी पाढा वाचला.

SCROLL FOR NEXT