अहमदनगर

नगर : किरकोळ वादावरुन एकास बेदम मारहाण

अमृता चौगुले

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : घरा शेजारील शोषखड्डा नांगरण्यास मज्जाव केल्याने चार जणांनी साहेबराव कोबरणे यांना लाथा-बुक्क्या, दांडा व विळ्याने मारहाण करण्यात आली. मारहाणीची ही घटना राहुरी तालुक्यातील गणेगाव येथे 16 जुलै रोजी घडली.

साहेबराव नारायण कोबरणे (वय 58, रा. गणेगाव, ता. राहुरी) यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली. दि. 16 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान एकजन ट्रॅक्टरने साहेबराव कोबरणे यांच्या घराशेजारील श्वास खड्डा नांगरत होता. साहेबराव कोबरणे त्यास, 'तू खड्डा का नांगरतो,' असे म्हणाल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून साहेबराव कोबरणे यांची गचांडी धरून खाली पाडले. लाथा- बुक्क्यांसह दांडा व विळ्याने मारहाण केली. शिवीगाळ करून दमदाटी केली.

साहेबराव कोबरणे यांच्या फिर्यादीवरून कैलास साहेबराव कोबरणे, सौरभ कैलास कोबरणे, राहुल साहेबराव कोबरणे व ट्रॅक्टर चालक (सर्व रा. गणेगाव, ता. राहुरी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पो. हवालदार ज्ञानदेव गर्जे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT