अहमदनगर

नगर : कायदा हातात घेतल्यास कारवाई

अमृता चौगुले

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सवात सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे. या काळात कायदा हातात घेणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांनी दिला.

पंचायत समितीच्या सभागृहात शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे, नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे, गटविकास अधिकारी संजय दिघे, उपसभापती किशोर जोजार, सतीश पिंपळे, रामभाऊ जगताप, गफूर बागवान, रणजित सोनवणे, बाळासाहेब कोलते यांच्यासह अधिकारी व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गणेश मंडळ व शांतता समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक मार्गावर येणारे अडथळे, तसेच विद्युत पुरवठा खंडित न होण्याबाबत मागण्या मांडल्या. अ‍ॅड मयूर वाखुरे, स्वप्निल मापारी, बालेंद्र पोतदार, सोमनाथ कचरे, तालुक्यातील पोलिस पाटील यांनी सूचना केल्या. यावेळी उपस्थित संबंधित अधिकार्‍यांना याबाबत लगेच नियोजन करण्याच्या सूचना स्वाती भोर यांनी केल्या. गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर वातावरण दूषित करणारे व समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज पडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. कायदा व सुव्यवस्था

अडचणीत येईल, असे कृत्य करू नये : करे

उत्कृष्ठ देखावे सादर करणार्‍या मंडळांना पारितोषिके व गौरवपत्र दिले जातील. सामाजिक जनजागृती देखाव्यावर भर गणेश मंडळांनी द्यावा. शांततेत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजय करे यांनी केले.

SCROLL FOR NEXT