अहमदनगर

नगर : इंजिन से ऑईल टपक रहा है म्हणत कर्जतला एक लाख लंपास

अमृता चौगुले

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : 'साहेब तुम्हारे गाडी के इंजिन से ऑईल टपक रहा है', असे म्हणत गाडीमध्ये असलेली एक लाखांची रोेकड दोन चोरट्यांनी लंपास केली. ही घटना कर्जत बसस्थानकावर सोमवारी (दि. 22) भर दिवसा साडेअकरा वाजता घडली.

याप्रकरणी देवराव बाबुराव भैलुमे (रा.भैलुमे वस्ती, कुळधरण रस्ता, कर्जत) यांनी फिर्यादी दिली आहे. यात त्यांनी म्हटले की, सकाळी 11 वाजता ते कर्जत बसस्थानका जवळील भारतीय स्टेट बँकेमध्ये गेले. त्यांनी बँकेतून एक लाखाची रक्कम काढली. यानंतर जवळच असणार्‍या एका दुकानातून त्यांची पिशवी घेऊन आले आणि कर्जत बसस्थानकामध्ये लावलेल्या कारजवळ आले. गाडी सुरू करून बसस्थानक प्रवेशद्वारावर आले असताना दोन अनोळखी गाडी समोर आले. 'साहेब तुम्हारे गाडी की इंजिन से ऑईल टपक रहा है,'असे म्हणाले. ते एवढ्यावर थांबली नाही. 'आपकी गाडी की इंजिन से धुवा भी निकल रहा है,' असे म्हणाल्यावर देवराव भैलुमे यांनी त्यांची कार थांबवली. तेव्हा त्या चोरट्याने तुम्ही गाडीमध्ये बसा आणि रिव्हर्स घेऊन बस स्थानकावरील मोकळ्या जागेमध्ये गाडी लावा असे म्हणाला. यावेळी गाडी मागे घेण्यासाठी तो त्यांना जागा आणि दिशा सांगत होता.

श्री भैलुमे यांनी बसस्थानकाच्या मोकळ्या जागे त गाडी थांबून, गाडीच्या खाली उतरले, त्या चोरट्याने त्यांना बोनेट उघडण्यासाठी मदत केली आणि कुठून धूर येत आहे पाहत असताना चोरट्यांनी संधी साधून गाडीच्या ड्रायव्हर सीटवर असलेले एक लाख रुपयांची बॅग उचलली आणि त्या ठिकाणी उभा असणार्‍या त्याच्या जोडीदाराला खूण करतात, तो त्या ठिकाणी दुचाकीवर आला आणि कोणाला काही समजण्यापूर्वी त्या दोघांनी त्या ठिकाणावरून धूम ठोकली.

हा प्रकार देवराव भैलुमे यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्या ठिकाणी उभा असणार्‍या नागरिकांना सांगितले. यानंतर घटनास्थळी दोन पोलिस उपनिरीक्षक व काही पोलिस कर्मचारी आले. त्यांनी बस स्थानक परिसरामध्ये पाहणी केली, तसेच बँक व बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दहा रुपयांची ऑईलची पुडी

त्या दोन चोरट्यांनी या चोरीसाठी अवघ्या दहा रुपयांची ऑईलच्या पुडीचा वापर केला. देवराव भैलुमे यांना ऑईल गळत आहे, असे म्हणत असताना त्यांनी त्याच्या हातातली ऑईलची पुडी गाडीच्या बोनेटवर सांडली आणि त्याच आधारे एक लाख रुपयांची बॅग पळविली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT