अहमदनगर

नगर : आमदार पवार फुगडीत दंग, रथयात्रेस आला रंग!

अमृता चौगुले

कर्जत, पुढारी वृत्तसेवा : ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराजांंच्या रथयात्रेत सहभागी होऊन भाविकांसमवेत फुगडी खेळण्याचा, तसेच टाळ-मृदंगाच्या निनादात आमदार रोहित पवार यांनी हरिनामाचा गजर चर्चेचा विषय ठरला आहे. आमदार रोहित पवार यांनी सकाळी गोधड महाराज यांच्या समाधीस अभिषेक केला. यानंतर पांडुरंगाची मूर्ती ठेवलेला रथ त्यांनी ओढला. यात्रेत रथापुढे अनेक दिंड्या सहभागी झाल्या हत्या. भगवी पताका खांद्यावर घेत टाळ-मृदंगाचा निनादात गोदड महाराज व पांडुरंगाचा गजर करत हे वारकरी सहभागी होतात.

आमदार रोहित पवारही भजनात सामील

आमदार पवार यांनीही वारकर्‍यांसमवेत टाळ वाजवत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. मनोरंजनासाठी आलेल्या साधनांचाही त्यांनी लाभ घेतला. खेळण्याच्या पाळण्यामध्ये ते बसले. यावेळी त्यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. स्टॉलवरील खाद्य पदार्थाचाही त्यांनी स्वाद घेतला. आमदार पवार यांचा साधेपणा अनेकांना भावला. सर्वसामान्यांमध्ये मिसळून वागण्याने अनेक जण हरखले.

आमदार पवार यांच्या पुढाकारामधून कामिका एकादशीच्या दिवशी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. अनेक भाविकांनी याचा लाभ घेतला.याशिवाय शहरातील मेन रोडवर विठ्ठल-रुखमाईंचा देखावा सादर करण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रथयात्रेत जिल्ह्यासह तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सद्गुरू गोदड महाराजांच्या ग्रंथांचे प्रकाशन

सद्गुरू गोदड महाराजांनी अनेक ग्रंथांसह विविध विषयांवर मोठे लिखाण केले. महाराजांनी तपश्चर्या करून सिद्धी आणि साधना प्राप्त केली होती.त्या आधारे त्यांनी लिखाण केले असून, यावर आधारित एका ग्रंथाच्या प्रकाशानाचा सोहळा आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT