नगर, पुढारी वृत्तसेवा : शंभर टक्के शास्ती माफी देऊनही मालमत्ता वसुलीला अल्पप्रमाणात वसुली प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अधिकार्यांनी थकीत मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची कारवाई करावी. कर्मचार्यांनी 15 दिवसांत उद्दिष्टानुसार वसुली करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी अधिकारी व कर्मचार्यांना दिल्या.
आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी 26 जुलै 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत दिलेल्या शंभर टक्के शास्ती सवलतीच्या अनुषंगाने वसुली आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप जावळे, उपायुक्त सचिन बांगर, सहायक आयुक्त सचिन राऊत, नगररचनाकार राम चारठाणकर, जलअभियंता परिमल निकम, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य लेखापरीक्षक विशाल पवार, मुख्य लेखाअधिकारी शैलेश मोरे, घनकचरा विभागप्रमुख डॉ. शंकर शेडाळे, नगरसचिव एस. बी. तडवी, अतिक्रमण विभागप्रमुख रोहिदास सातपुते, वसुली विभागप्रमुख सुनील चाफे, प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजन आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. जावळे म्हणाले, मालमत्ता कर वसुलीस शास्ती माफी देऊन अल्पप्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रभाग अधिकरी व त्यांच्या कार्यक्षेत्रातील अधिकार्यांनी मालमत्ताधारकांविरोधात जप्तीची कारवाई सुरू करावी. त्यामुळे 15 दिवसांत प्रत्येक वसुली लिपिकांना उद्दिष्टानुसार वसुली केलेली नाही. त्यामुळे 15 दिवसांत प्रत्येक वसुली लिपिकांनी उद्दिष्टानुसार वसुली करावी. सर्व प्रभाग कार्यालयानुसार प्रभावी वसुली मोहीम राबविण्यासाठी प्रभाग अधिकारी नेमण्याचे आदेश दिले.