अहमदनगर

नगर : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पथकाचा छापा

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नालेगाव येथे अवैधरित्या सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. गॅस सिलेंडर, गॅस रिफिलिंग मशीन, वजन काटा असा सुमारे 32 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

विकास नारायण खोसे (रा. एमआयडीसी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात माळीवाडा अन्न धान्य वितरण कार्यालयातील पुरवठा निरीक्षक गिरीष मधुकर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. नालेगाव येथे अवैधरित्या गॅस रिफिलिंग केली जात असल्याची माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पुरवठा निरीक्षक गिरीष गायकवाड, वितरण अधिकारी अर्चना पागिरे, जयंत भिंगारदिवे यांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.

SCROLL FOR NEXT