अहमदनगर

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकास अटक

अमृता चौगुले

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील एका वाडीवरील अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात 'पोस्को' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला अटक केली आहे.

तालुक्यातील एका वाडीत गेल्या सहा महिन्यापासून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. याप्रकरणी प्रदीपच्या (नाव बदलेले) विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक केली आहे. त्याने मुलगी अंघोळ करताना त्याच्या मोबाईलवर फोटो काढून मुलीस दाखवून हा फोटो लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व 'तुझ्या नातेवाईकांना,' पाठवून देईल, अशी धमकी दिली.

वाडीवरील एका घरात, हॉटेलवर अल्पवयीन मुलीवर आत्याचार केला. बळजबरीने शारीरिक संबंध ठेवून तिचे फोटो काढले तसेच आंघोळ करताना व्हीडिओ कॉल करून कॉल चालू असताना त्याच्या मोबाईलवरून स्क्रीन शॉट घेतले असल्याची माहिती गुन्ह्यामध्ये नमूद करण्यात आली. याप्रकरणी संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

SCROLL FOR NEXT