नगर, पुढारीवृत्तसेवा : अनधिकृत फ्लेक्स बोर्ड काढण्याची मोहीम राबवित बुधवारी मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने शहरातील 30 बोर्ड हटविले.
शहरात पथदिवे व अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत फ्लेक्स लागले आहेत. त्यापासून मनपास उत्पन्न नसल्याने त्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी स्थायी समितीमध्ये नगरसेवक मुद्दसर शेख, विनीत पाऊलबुद्धे, रवींद्र बारस्कर यांनी केली होती. त्यावर सभापती कुमार वाकळे यांनी अतिक्रमण विरोधी पथकाच्या अधिकार्यांना तत्काळ सूचना देत कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी शहरातील प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयातील पथकांकडून कारवाई करण्यात आली.