अहमदनगर

नगर : …अखेर खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रारंभ

अमृता चौगुले

चांदेकसारे : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील झगडेफाटा ते तळेगाव या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. पोहेगाव गणपती मंदिराजवळ या रस्त्यात मोठे खड्डे पडले होते. वाहन चालकांना आपली वाहने कशी चालवावी. याचा अंदाज या खड्ड्यामुळे येत नव्हता.अ‍ॅड. राहुल रोहमारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत संपर्क साधला असता काल तातडीने या रस्त्यावर पडलेले खड्डे जेसीबीच्या साहाय्याने बुजविण्यात आले आहे.

झगडे फाटा ते तळेगाव कोपरगाव तालुक्याच्या हद्दीत असलेल्या कोपरगाव-संगमनेर रस्त्याची पुरती वाट लागली आहे. येत्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे हा रस्ता पूर्ण खचला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्याच्या कामाची मंजुरी देखील आली असल्याचे समजते आहे. मात्र, पाऊस सुरू असल्यामुळे अजून टेंडर निघाले नाही. त्यामुळे हा रस्ता आता दुरुस्त कधी होणार असा प्रश्न वाहनचालकांना व प्रवास करणार्‍या नागरिकांना पडला आहे.

पोहेगाव गणपती मंदिर व मुजगुले वस्ती शाळे दरम्यान या रस्त्याची पुरती वाट लागली आहे. वाहन चालकांना वाहन कसे चालवावे. असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुचाकी व पायी चालणार्‍या नागरिकांना या खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणपती मंदिराजवळ रोहमारे वस्तीनजीक पडलेले खड्डे राहुल रोहमारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला.

रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवला नाही, तर या खड्ड्यामुळे अनेक अपघात होऊ शकतात. असे निदर्शनास आणून दिले. त्यांच्या माहितीची तत्काळ दखल घेत अधिकार्‍यांनी देखील तत्काळ हा खड्डा बुजून दिला. मात्र, आता या रस्त्यांच्या दुरुस्तीची गरज आहे.
तळेगाव – संगमनेरप्रमाणे कोपरगाव हद्दीत येत असलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT