अहमदनगर

नगर : अकोलेत अवैध दारू पकडली

अमृता चौगुले

अकोले, पुढारी वृत्तसेवा : कोल्हार-घोटी रोडने एक इसम चारचाकी वाहनातून दारुचे बॉक्स घेऊन जात असताना हे वाहन पोलिसांनी पकडले. यामध्ये 16 हजार रुपयांची दारू व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी कोल्हार-घोटी रोड वर केळुगंण फाटा येथे नाकाबंदी केली होती. दरम्यान, एक व्यक्ती चारचाकी गाडी घेऊन समोरून आला. सदर गाडी थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये 16 हजार 800 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या देशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या प्रत्येकी 180 मिली व 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चारचाकी असा एकूण 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दारुची वाहतूक करणारा किसन सोना बांडे (वय 45, रा. खडकी खुर्द, ता. अकोले) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध पोलिस कॉन्स्टेबल अशोक गाढे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक वाडेकर करत आहे. स. पो. नि. नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. प्रकाश भैलुमे, पो. हवालदार विजय मुंढे, पो. कॉ. अशोक गाढे, पो. कॉ. अशोक काळे यांनी कारवाई केली.

SCROLL FOR NEXT