अहमदनगर

नगर: 9 ग्रामपंचातींच्या 11 जागांसाठी उद्या मतदान

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील96 ग्रामपंचायतींच्या 142 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. 107 जागांवर उमेदवारी अर्जच दाखल झाले नाहीत. 18 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे 9 ग्रामपंचायतींच्या 11 जागांसाठी रविवारी मतदान होत आहे.

विविध कारणामुळे 142 जागा रिक्त झाल्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 13 मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. 25 मेपर्यंत अर्ज माघारीचा कार्यक्रम राबविण्यात आला. 18 जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाले. त्यामुळे 18 जागा बिनविरोध झाल्या. 107 जागांवर एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

त्यामुळे निवडणुकीला स्थगिती देण्यात आली. यामध्ये अकोले तालुक्यातील सर्वाधिक 84 जागांचा समावेश आहे. याशिवाय राहुरी तालुक्यातील 6,नगर, पारनेर तालुक्यातील प्रत्येकी 5,व शेवगाव तालुक्यातील 3 जागांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT