अहमदनगर

देवगडच्या दिंडीचे घोडेगावात स्वागत

अमृता चौगुले

घोडेगाव : पुढारी वृत्तसेवा :
नेवासा तालुक्यातील देवगड येथील समर्थ सद्गुरु किसनगिरी महाराज दिंडी सोहळ्याचे कांगोणी फाटा येथे मंत्री शंकरराव गडाख यांच्यातर्फे मुळा एज्युकेशनचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी स्वागत केले.

यावर्षी मोजक्याच्या वारकर्‍यांच्या उपस्थितीत देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण झालेल्या दिंडी सोहळ्याचे उदयन गडाख यांनी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांचे पूजन करून दर्शन घेतले.

यावेळी रामनाथ महाराज पवार, बाळू महाराज कानडे, नारायण महाराज ससे, बाळासाहेब सोनवणे, अनिलराव सोनवणे, सचिन चोरडिया, विष्णू चौधरी, श्रीनिवास मोटे, हरि जरे आदी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT