अहमदनगर

दहा वर्षांनंतर पुन्हा फुलला त्यांचा संसार

अमृता चौगुले

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तब्बल दहा वर्षांपासून पती-पत्नीचा कौटुंबिक वाद अखेर लोक अदालतीमध्ये तडजोडीने संपुष्टात आला. यानिमित्ताने कुटुंबाचा संसार पुन्हा फुलला. विधी सेवा प्राधिकारण व नेवासा वकील संघातर्फे राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले होते. नेवाशातील दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांच्या समोर 10 वर्षापूर्वीचा कौटुंबिक वादातील उषा राजेश चित्ते यांनी मुलगा युवराज राजेश चित्ते याच्या समवेत 2007 मध्ये त्यांचे पती राजेश जगत्राथ चित्ते यांच्या विरोधात दावा दाखल केला होता.

या निकालावरून 2013 मध्ये पोटगी वसुलीसाठी अर्ज न्यायालयामध्ये प्रलंबित होता. अर्जदार उषा यांच्यातर्फे अ‍ॅड.सुदाम ठुबे यांनी प्रथमवर्ग दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. जाधव यांच्या समोर त्यांची बाजू मांडली. तेव्हा कोर्टाने या तडजोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन 10 वर्षापूर्वीचा कौटुंबीक वाद संपुष्टात आणला. पुन्हा त्यांचा नवा संसार फुलला आहे. न्यायाधीश एस.व्ही. जाधव यांनी उषा व राजेश यांचे गुलाब पुष्प देऊन अभिनंदन केले. या तडजोडी प्रसंगी अ‍ॅड. भारतभूषण मौर्य व अ‍ॅड. रमेश पाठे यांचे सहकार्य लाभले.

SCROLL FOR NEXT