अहमदनगर

गुरुजी, ‘दप्तर’ तयार ठेवा..! ‘पंचायत राज’ समिती चा धसका

अमृता चौगुले

नगर :  पुढारी वृत्तसेवा: पंचायत राज समितीचा दौरा निश्चित झाल्यापासून जिल्हा परिषद प्रशासकीय वर्तुळात अनेकांची झोप उडाली आहे. ही समिती शाळांचीही तपासणी करणार असल्याने शिक्षण विभागानेही सर्व शाळांना पत्र पाठवून पोषण आहार, शाळा व्यवस्थापन समिती, शिष्यवृत्ती, गणवेश वाटपाचे आवश्यक 'दप्तर' तयार ठेवण्याची तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

23 ते 25 जून दरम्यान, पंचायत राज समिती जिल्ह्यात येणार आहे. या समितीत 32 आमदार असून, वेगवेगळ्या विभागांचे ऑडिटर व अन्य अधिकारीही असणार आहेत. ही समिती जिल्ह्यातील आरोग्य केंद्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती आणि शाळांचीही पाहणी करणार आहेत. त्यामुळे सर्वच विभागांनी समितीची नाराजी ओढावू नये, यासाठी 'कागदांची' जुळवाजुळव सुरू केली आहे. शिक्षण विभागानेही याबाबत गांभीर्याने पाऊले उचलली आहेत.

शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी सर्व मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. त्यासाठी 6 जून रोजी बैठक घेतली होती. त्यानुसार पंचायत राज समिती डोळ्यांसमोर ठेवून शाळा स्तरावर तयारीला वेग आला आहे. 2016-17, ते सन 2021-22 या वर्षांतील आर्थिक अभिलेखे, शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठ्यपुस्तके वाटप, मोफत गणवेश वाटप योजना, विविध शिष्यवृत्त्या, दिव्यांग समावेशित शिक्षण, विद्यार्थ्यांना लाभ दिलेली माहिती अद्ययावत ठेवावी, शाळा स्तरावरील विविध समित्यांचे इतिवृत्त लेखण पूर्ण करावे, पाठ्यपुस्तक वाटप पहिल्याच दिवशी करण्यात यावे, वाटप रजिस्टर अद्ययावत ठेवावे, दाखल पात्र विद्यार्थी उद्दिष्टानुसार 100 टक्के नोंदणी पूर्ण करावी, सेतूवर्ग नियोजन परिपत्रकाप्रमाणे करण्यात यावे, नियमित टाचण काढण्यात यावे, इयत्ता 5 वी ते 8 वी शिष्यवृत्ती जादा तास चालू ठेवावेत, गणवेश वाटप पहिल्याच दिवशी करण्यात यावे, पीएफएमएस प्रणालीव्दारे पैसे खात्यात वर्ग होतील, त्यासाठी पूर्तता करणे, राज्य लोकसेवा हक्क कायदा 2015 फ्लेक्स बोर्ड प्रत्येक शाळेत लावणे, 2018-19 मधील शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकाच्या झेरॉक्स केंद्र शाळेत जमा करणे, लॉकडाऊन काळात ऑनलाईन व ऑफलाईन अध्यापनाचे रेकॉर्ड व गृहभेटी अद्ययावत ठेवाव्यात, इत्यादी सूचना करण्यात आल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT