अहमदनगर

कोरठणला वटपौर्णिमा उत्सव उत्साहात

अमृता चौगुले

कान्हूरपठार : पुढारी वृत्तसेवा

लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या पिंपळगाव रोठा (ता. पारनेर) येथील कोरठण खंडोबा देवस्थानला वटपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात आयोजित केला. पुणे, नगर, नाशिक, मुंबई व ठाणे येथून आलेल्या भाविकांनी पौर्णिमा पर्वणीत कुलदैवत खंडोबाचे कुळधर्म कुलाचार करून दर्शन घेतले.

महिलांनी वटसावित्री पौर्णिमा व्रत म्हणून मंदिर परिसरातील वटवृक्षाची पूजा करून कुलदैवताचे दर्शन घेऊन आपल्या सौभाग्यासाठी अखंड आशीर्वाद घेतले. सकाळी सहा वाजता खंडोबा स्वयंभू तांदळा मूर्तीला मंगलस्नान, पूजा होऊन व नंतर साजशृंगार चढवण्यात आला.सकाळी सात वाजता महाअभिषेक पूजा, आरती अशोक शिंदे व अश्विनी शिंदे (डोंबिवली), पोपट घुले व संगीता घुले, हिराबाई खोसे व कुशाभाऊ खोसे, मळीभाऊ रांधवण व संगीता रांधवण आदींच्या हस्ते करण्यात आली.

याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग गायकवाड, विश्वस्त बन्सी ढोमे, किसन मुंढे, रामदास मुळे, दत्तात्रय खोसे, रामदास शेळके, हनुमंत सुपेकर आदी उपस्थित होते. सकाळी साडे नऊ वाजता खंडोबा उत्सव मूर्तीची पालखीतून प्रदक्षिणा मिरवणूक ढोल, लेझीमच्या तालावर सुरू झाली. भाविकांनी पालखीचे दर्शन घेऊन खोबरे भंडार्‍याची उधळण केली. 'येळकोट…येळकोट, जय मल्हार,' गजराने परिसर भारावून गेला.

पालखी विसावा घेऊन लंगर तोडण्याचा विधी झाल्यावर अन्नदात्यांकडून पालखीला नैवद्य अर्पण करण्यात आला. पालखी मंदिरात परतल्यावर अन्नदान मंडपात महाप्रसाद देण्यात आला. पोपट देवराम घुले, अशोक शिंदे (डोंबिवली ),बळीभाऊ रांधवण, कुशाबा खोसे यांच्यातर्फे महाप्रसाद वाटप झाले.

SCROLL FOR NEXT