अहमदनगर

केडगावात एकास जबर मारहाण; कोतवालीत गुन्हा

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : केडगावमधील सातपुते मळा येथे घराचा दरवाजा का वाजवला? अशी विचारणा केल्याचा राग येऊन 6 ते 7 जणांनी एकाला लाथा-बुक्क्या व लाडकी दांडक्याने जबर मारहाण केल्याची घटना दि. 2 रोजी घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयसिंग भाऊसाहेब सातपुते (वय 36, रा. सातपुते मळा, केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. जयसिंग सातपुते हे शुक्रवारी सकाळी घरात बसलेले असताना कोणीतरी त्यांच्या घराची कडी वाजवली.

त्यानंतर सातपुते यांनी दरवाजा उघडून पाहिला असता एका वाईनशॉपमध्ये काम करणारा अनोळखी कामगार त्यांना दिसला. त्याला नाव विचारले असता, राग येऊन त्याने सातपुते यांनाच शिवीगाळ केली. तसेच दुपारी 1.30 च्या सुमारास सातपुते हे त्यांच्या घराच्या ओट्यावर बसलेले असताना, तेथे प्रदीप पठारे, राहुल पठारे यांच्यासह 5 ते 6 अनोळखी तरूण आले. त्यांनी 'तू माझ्या कामगारासोबत हुज्जत का घालतो?', असे म्हणत सातपुते यांना लाडकी दांडक्याने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT