अहमदनगर : पुढारी वृत्तसेवा भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वर्षा पर्यटनासाठी आलेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यापैकी दोन मृतांची ओळख पटली असून तिसऱ्याचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
रमाकांत प्रभाकर देशमुख वय ३४ रा.ताड पिंपळगाव. ता.कन्नड. जि.औरंगाबाद व अरिष प्रभाकर पालोदकर वय ३५ मु पो.पालोद ता. सिलोड अशी मृतांची नावे आहेत. तिसऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
औरंगाबाद कडून नाशिक मार्गे भंडारदराकडे जात असताना कळसुबाई शिखरा जवळ पेडशेत लगतच्या पाण्यात माेटार पाण्यात गेल्याने हा अपघात झाला असुन, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला.