अहमदनगर

अतिक्रमणविरोधी पथकावर हल्ला प्रकरणी नगर मनपात काम बंद आंदोलन

अमृता चौगुले

नगर, पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण विरोधी पथक मंगळवारी शहरातील बाबा बंगाली परिसरात अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेले असता अतिक्रमणधारकांनी पथकावर दगडफेक केली. त्या निषेधार्थ आज मनपा कामगार संघटनेने काम बंद आंदोलन केले. आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्या केल्या. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.

अतिक्रमण विरोधी पथकावरील दगड फेकीच्या निषेधार्थ मनपाच्या चारही प्रभाग समित्यांचे कार्यालय बंद ठेवण्यात आली, तसेच जुनी महापालिका व महापालिकेतील कामकाज बंद ठेवण्यात आले. सकाळी महापालिका कामगार संघटनेतर्फे मनपात गेट सभा घेण्यात आली. यावेळी कामगार संघटनेचे अनंत लोखंडे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेतली.

शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यास कायम स्वरूपी पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. त्याशिवाय मोहीम राबवू नये. तसेच हल्ल्यातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, त्यासाठी पोलिस अधीक्षकांना पत्र देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. आयुक्त गोरे यांनी दोन्ही मागण्या मान्य केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत उद्या कामकाज बंद ठेवण्याबाबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा सुरू होती.

SCROLL FOR NEXT