कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : कोल्हार येथे खर्डे वस्तीवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून धुमाकूळ घालणारा बिबट्या शुक्रवारी मध्यरात्री पिंजर्यात जेरबंद झाला. कोल्हार- तिसगाव रस्त्यावरील खर्डे वस्तीवरील वसंत भगवंत खर्डे पा. व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पा. कारखाना माजी संचालक राजेंद्र अण्णासाहेब खर्डे पा. यांच्या वस्तीवर दीड महिन्यापासून बिबट्याने कुत्रे व शेळ्यांचा फडशा पाडला. या वस्तीवरील रहिवाशी जीव मुठीत घेऊन वावरत होते.
धनंजय अण्णासाहेब खर्डे व वस्तीवरील काहींनी रात्री या बिबट्याला वस्ती परिसरात पाहिले. राजेंद्र खर्डे यांनी वनविभागात या बिबट्या बाबत माहिती देऊन, पिंजरा लावण्याबाबत सांगितल्याने वीस दिवसांपूर्वी लावलेल्या पिंजर्यात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या अडकला. शेतमजूर धनंजय जामोद यांनी सकाळी ही माहिती राजेंद्र खर्डे यांना दिली. पिंजर्यातील बिबट्या पाहण्यास अबाल वृद्धांनी गर्दी केल्याचे चित्र दिसले.