अहमदनगर

अकोले: औषधी वनस्पतींची शेती काळाची गरज : डॉ. एस. एच. पाटील

अमृता चौगुले

अकोले: पुढारी वृत्तसेवा : आपला निसर्ग हा सर्वगुण संपन्न आहे. निसर्गामध्ये जैवविविधता ओतप्रोत भरलेली आहे. औषधी वनस्पतींची शेती काळाची गरज आहे. त्यातूनच आपल्या सर्वांचे आरोग्य सुदृढ होणार आहे. असा आत्मविश्वास महाराष्ट्र राज्याचे जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस.एच.पाटील यांनी व्यक्त केला.

अकोले येथील शेंडी, भंडारदरा येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने व सावित्रीबाई फुले पुणे, डॉ. विखे पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, सात्रळ आणि राहाता महाविद्यालय यांच्या संकल्पनेने एक दिवसीय 'औषधी वनस्पतींचे संवर्धन लागवड मूल्यवर्धन व बाजारपेठ' या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.

यावेळी पश्चिम विभागीय क्षेत्रीय संचालक व प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट यांनी औषधी वनस्पतींच्या विविध प्रजातींची माहिती देताना प्रत्येक वनस्पतींचे मानवी जीवनातील महत्व विशद केले. हिरडा, बेहडा, आवळा, अडुळसा व शेवगा ह्या वनस्पती दुर्धर आजारावर किती उपयुक्त आहेत, त्याचे महत्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. यावेळी भंडादराचे वनविभाग अधिकारी अमोल खाडे, डॉ. स्वप्निल शिंदे यांच्यासह अकोले, राजूर, शेंडी व भंडारदरा येथील 200 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.

सुरुवातीला प्राचार्य बाबासाहेब देशमुख यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. प्रदिप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून कोविडच्या काळात औषधी गुणधर्म असणार्‍या वनस्पतींचे कोविडच्या काळात औषधी वनस्पती असणार्‍या वनस्पतींचे महत्व विशद केले. या कार्यशाळेत डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. स्वप्निल शिंदे, डॉ. नयनसिहं ठाकूर यावर अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.

सहभागी शेतकर्‍यांनी आपल्या विविध शंका यावेळी उपस्थित केल्या. यासर्व शंकाचे अभ्यासपुर्ण रितीने व उदाहरणे देऊन निरसण केले. आजपर्यंत अशा पध्दतीचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले नाही. अशा भावना सहभागी शेतकर्‍यांनी व्यक्त केल्या. क
ार्यशाळेसाठी डॉ.अनिल वाबळे, डॉ.रामदास बोरसे, डॉ.दिपक घोलप, डॉ.संजय गिरी डॉ.बाळासाहेब मुंजे, डॉ.संजय लाहरे मोलाचे सहकार्य केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT