अहमदनगर

कोळपेवाडी : ‘योजना आपल्या दारी’ उपयुक्त : आ. आशुतोष काळे

अमृता चौगुले

कोळपेवाडी; पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघात जास्तीत-जास्त पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी 'योजना आपल्या दारी' उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. कोपरगावातील नागरिकांसाठी सुभाषनगर येथील श्रीलक्ष्मी माता मंदिर येथे 'शासकीय योजना आपल्या दारी' उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी आ. काळे यांनी भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. ते म्हणाले, नागरिकांसाठी राबविण्यात येणार्‍या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अनेक शासकीय कागदपत्रांची आवश्यकता असते, मात्र या योजनांसाठी पात्र असताना देखील अनेक पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहतात. यामुळे अशा पात्र नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे.

आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता वेळेत होवून त्यांना लवकर सुलभपणे या योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे सांगत हा उपक्रम नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आ. काळे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, माजी नगरसेवक मंदार पहाडे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, एकनाथ गंगूले, अक्षय आंग्रे, बाळासाहेब सोनटक्के, राजेंद्र आभाळे, सोहिल कुरेशी, वाजीद कुरेशी, ऋषीकेश धुमाळ, सचिन शिंदे, राजेंद्र मरसाळे, नदीम कुरेशी, शेखर डहानके, निलेश शिंदे, अझर खाटीक, किशोर चव्हाण, बंटी चावरे, प्रविण चौधरी आदींसह शहर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT