अहमदनगर

कोल्हार खुर्द : महिला सरपंच शिरसाठांचा अवैध धंद्यांविरुद्ध एल्गार!

अमृता चौगुले

कोल्हार खुर्द(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील महिला सरपंच अनिता दिगंबर शिरसाठ यांनी अवैध धंद्याविरोधात आवाज उठविण्याचे प्रसिद्धी पत्रक देत 'महिलाराज' आता अवैध धंद्याविरोधात एल्गार पुकारणार असल्याचे स्पष्ट केले. कोल्हार खुर्द येथे चार महिने अगोदर ग्रामपंचायत निवडणूक झाली.

विखे गटाच्या अनिता दिगंबर शिरसाठ लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या, परंतु त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गावातील अनेक प्रलंबित प्रश्न त्यांच्यापुढे होते, मात्र गावातील महत्वाच्या जटिल प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधून प्रथमतः गावातील व्यवसायाचे उच्चटन करण्याचा निर्णय घेऊन अनिता यांनी महिला सदस्यांना सोबत घेऊन अवैध व्यावसायाविरोधात आंदोलन करून हे व्यवसाय गावातून हद्दपार करण्याचा विडा उचलला आहे.

कोल्हार खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांचे पेव फुटले आहे. अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत आहेत. या अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या मुसक्या अवळणार आहे. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे. अवैध व्यवसायच्या माध्यमातून कुणाचीही दहशत खपवून घेतली जाणार नाही.

                                 – अनिता दिगंबर शिरसाठ,
                                           लोकनियुक्त सरपंच.

SCROLL FOR NEXT