अहमदनगर

तिसगावची पुनरावृत्ती होणार का?

अमृता चौगुले

करंजी : पुढारी वृत्तसेवा :  पाथर्डी तालुक्यातील जवळपास 14 ग्रामपंचायतींच्या निवडणूका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची जवखेडे खालसा ग्रामपंचायतीची निवडणूक याच टप्प्यात होणार आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत जातीय समीकरणावर अवलंबून राहणार का? अशी चर्चा गावांमध्ये कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
पाडव्यापासून जवखेडे येथे दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण झाला आहे.

दोन्ही समाजातील प्रमुख व्यक्तींचा एकमेकांशी कमी झालेला संवाद ही या निवडणुकीला कारणीभूत ठरण्याजोग आहे. जवखेडे येथे तिसगाव ग्रामपंचायतची पुनरावृत्ती होऊ शकते अशीही शक्यता काहींकडून वर्तवली जात आहे. तर, जवखेडे जातीपाती सारख्या संवेदनशील मुद्द्याला महत्त्व न देता विकासाला महत्त्व देऊन ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे जाऊ शकते असेही काही जाणकारांचे मत आहे. जवखेडे येथे जातीनिहाय मतदान आकडेवारीचा विचार करता मराठा समाज 700, तर मुस्लिम समाज 700 व ओबीसीसह इतर 1400 मतदार आहेत. एकूण मतदार संख्या 2800 आहे.

SCROLL FOR NEXT