अहमदनगर

पुणतांबा : गावाच्या प्रश्नांसाठी लढत राहणार : धनंजय जाधव

अमृता चौगुले

पुणतांबा; पुढारी वृत्तसेवा : सर्वसामान्य जनतेचे प्रेम, आशिर्वाद सदैव पाठीशी असल्याने सत्ता असो किंवा नसो सामान्य माणूस, शेतकरी आणि गावाच्या प्रश्नांसाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे किसान क्रांतीचे मुख्य राज्य समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले.
जाधव यांचा वाढदिवसानिमित्त पुणतांबा व परिसरातील विविध संघटना व तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गणेश कारखान्याचे माजी संचालक रामदास बोरबने होते.

यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे, बाळासाहेब चौधरी प्रताप वहाडणे,न पा वाडीचे उपसरपंच दत्ता जाधव, सर्जेराव जाधव, किसन बोरबने,अण्णा डोखे, कचेश्वर वहाडणे, शिवाजी गमे,भारत वहाडणे, सोसायटीचे अध्यक्ष सुधाकर जाधव, उपाध्यक्ष अशोक धनवटे, डॉ चव्हाण, गणेश बनकर, चंद्रकांत वाटेकर, कृषीकन्या निकिता जाधव ग्रामपंचायत सदस्या सुनंदा जाधव आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला पुन्हा संधी मिळाली नाही, परंतु या पराभवामुळे जोमाने काम करण्यासाठी ताकद मिळाली आहे. पुन्हा सत्तेतून गावच्या विकासासाठी भरीव निधी मिळवता आला असता, मात्र राज्यात नव्हे देशात नावलौकिक मिळविलेल्या पुणतांब्याच्या विकासासाठी आणि शेतकर्‍यांच्या विविध पश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. धनंजय जाधव यांच्यात नेतृत्वाचे असून गावाच्या विकासासाठी त्यांचे नेहमीच प्रयत्न राहिले आहेत पुढील काळात त्यांना निश्चित संधी मिळणार असल्याचा विश्वास सुभाष वहाडणे यांनी व्यक्त केला. सुभाष जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

राज्यात काम करण्याची संधी मिळणार
सन 2017 मध्ये येथे पुकारण्यात आलेल्या शेतकरी संपामुळे पुणतांब्याची त्याच बरोबर जाधव यांची राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली असून किसान क्रांतीच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर काम करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव यांना लवकरच राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सुतोवाच या कार्यक्रमातून मिळाले.

SCROLL FOR NEXT