अहमदनगर

श्रीरामपूर : 6.50 कोटींची व्हे पावडर जप्त; रांजणखोल येथे अन्न व औषध प्रशासनाचा छापा

अमृता चौगुले

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा: शहरानजीक रांजणखोल (ता. राहााता) परिसरात 6.50 कोटींचा दूध पावडर व व्हे पावडरचा साठा अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून पकडल्याने खळबळ उडाली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त स. पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हा छापा टाकल्याचे सांगण्यात आले. मे. श्री एंटरप्रायजेस, 106 (रांजणखोल, ता. राहाता, जि. अ.नगर) येथे खासगी मालकाचे गोडावून आहे.

येथे सन फ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्री प्रा. लि. या कंपनीने विनापरवाना साठविलेला सुमारे 6 कोटी 50 लाख रुपये किमतीचा दूध पावडर व व्हे पावडरचा साठा अन्न व औषध प्रशासनच्या पथकाने कारवाई करून जप्त केला. अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत कंपनीच्या वतीने हजर झालेल्या अधिकार्‍यांनी या साठ्याबाबत कोणताही समाधानकारक खुलासा केला नाही अथवा कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त स. पा. शिंदे यांनी सांगितले.

या कारवाईत अन्न व औषध प्रशासन (अ.नगर) येथील अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सहाय्यक आयुक्त प्रमोद काकडे, अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार व नमुना सहाय्यक अधिकारी प्रसाद कसबेकर यांच्या समवेत केली. दरम्यान, अन्न नमुने अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT