अहमदनगर

अकोले: भंडारदरा ९३ टक्के भरले, धरणातून विसर्ग सुरु

अमृता चौगुले

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेल्या भंडारदरा धरण शुक्रवारी सांयकाळी ९३ टक्के भरले आहे. भंडारदरा धरणातुन १ हजार ९१५, तर निळवंडे धरणातून २ हजार ४०० क्ययुसेक पाणी सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी-अधिक आहे. धरणातून विद्युत निर्मिती करिता ८३५ क्ययुसेकने तर स्पिलवे गेेेटमधूून १०९० क्युसेकनेे पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. ११०३९ दशलक्ष घनफूट साठा क्षमता असलेल्या भंडारदरा धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी नियंत्रित ठेवत सायंकाळी सहा वाजता १० हजार २६४ घनफुटावर स्थिर करण्यात आला. धरणााची पाणी पातळी २१२.४४ फुुटावर ठेवण्यात आली आहे. उशिराने मान्सून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात दाखल होऊन स्थिरावला आहे. त्यामुळे भंडारदरा धरण दोन दिवसांमध्ये तांत्रिकदृष्ट्या भरले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने निळंवडे धरण पाणी साठा ६८११ (८१ टक्के) दशलक्ष घनफुटवर पोहचला आहे. गे

मान्हेरचा सिनापावली, केळूगणचा प्रेमदरा, दरेेवाडीचा धामण्या ओहोळ, कातळापूरचा तेरुंगणमधील पिंपरचोडा आदि ओढे- नाल्यांमधून प्रवरा नदी पात्रात पाणी वाहत आहे. भंंडारदरा धरणाच्या पाणलोटात हलक्या सरी कोसळत आहे. भंडारदरा धरणात पाणी पातळीवर धरणाचे शाखा अधिकारी अभिजित देशमुख, वसंत भालेराव, प्रकाश चव्हाण, मंगळीराम मधे,चंद्रकांत भगत,अत्तु संगभोर,प्रकाश उघडे व कर्मचारी लक्ष ठेेेवुन आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT