अहमदनगर

पाथर्डी तालुका : विठ्ठलवाडीचा तलाव झाला ओव्हरफ्लो!

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील विठ्ठलवाडीचा तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्यातून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. गेल्या दहा ते बारा दिवसापासून या परिसरात जोरदार पाऊस े झाल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, तलावाच्या सांडव्यामधून शुक्रवारी रात्रीपासून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे विठ्ठलवाडी व परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

मागील वर्षी तलाव लवकर भरला होता. सांडव्यातून बाहेर पडलेले पाणी बंधारे, पाझर तलाव भरून उर्वरित पाणी हे घाटशील पारगाव तलावात जाऊन तलाव भरण्यासाठी मदत होते. विठ्ठलवाडीच्या मध्यम प्रकल्पांतर्गत तलाव सुमारे 1980 सालचा आहे. तलावामुळे शेतकर्‍यांना चांगला फायदा होऊन शेती करण्यासाठी पाण्याचा फायदा होऊन साठलेले तलावातील पाणी उन्हाळा पर्यंत शेती आणि पिण्यासाठी उपयोगी ठरते. यावर्षी थोडा उशिरा तलाव भरला असून यंदा उसाची लागवड या भागात कमी असल्याने तलावातील पाणी उपसा कमी होणार आहे.

मागील वर्षी अतिरिक्त ऊस झाल्याने शेतकर्‍यांपुढे अनेक अडचणी ऊस तोडून कारखान्यापर्यंत जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्यावर ते लक्षात घेता ऊसाचे पीक करण्यात शेतकर्‍यांचा कल नसून, नगदी पिकांकडे शेतकरी वळाले आहे. शेतकर्‍यांपुढें कमी पाऊस,वीज, अतिवृष्टी, दुष्काळ तर रानडुक्कर या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, आता पाऊस झाल्याने तलावात पाणी आल्यामुळे शेतीला पाणी मुबलक उपलब्ध झाले आहे. पाण्यामुळे का होईना शेतकर्‍यांना शेती करण्यासाठी मदत होणार आहे. गेल्या दहा दिवांपासून सततच्या पावसाने उडीद, सोयाबीन, कादा पिकांना फटका बसला आहे. तलाव भरल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तलावाच्या सांडव्याची भिंत खराब झाली असून खालच्या बाजूने पाण्याची गळती होते. ते थांबवण्यासाठी भिंतीची दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. या कामासाठी शासनाने लक्ष घालावे.
                                                                          सुभाष दहिफळे                                                                                                  शेतकरी, विठ्ठलवाडी

हा मध्यम प्रकल्प जोरदार पावसाने भरला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण आहे.तलावाकडे जाणार्‍या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची गरज आहे.
                                                                 वैभव दहिफळे,
                                                     ग्रामस्थ, विठ्ठलवाडी, ता. पाथर्डी

विठ्ठलवाडीचा तलाव भरल्याने या तलावर अवलंबून असणारी परिसरातील शेती चांगल्या पद्धतीने फुलणार असून शेतकर्‍यांची पाण्याची समस्या उन्हाळ्यापर्यंत मिटले आहे.
                                                          पुष्पा मिसाळ,
                                                      सरपंच, चिंचपूर इजदे

 

SCROLL FOR NEXT