अहमदनगर

नगर : अतिवृष्टी अनुदानात कर्मचार्‍यांचा दुजाभाव

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचार्यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांचे पंचनामे करताना दुजाभाव केला असल्याचा गंभीर आरोप माळेगाव पठार येथील शेतकर्‍यांनी महसूल सप्ताह निमित्ताने संगमनेरच्या दौर्‍यावर आलेले विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमोर केला. त्यावर आता येथून पुढे पंचनामा सुद्धाऑनलाईन होणार आहे. त्यासाठी अ‍ॅपही उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना महसूलच्या अधिकारी व कर्मचार्‍यांवर अवलंबून न राहता नुकसानग्रस्त शेतपिकाचा पंचनामा स्वतःच करून या अ‍ॅपद्वारे शासनाकडे पाठवावा. त्यामुळे आता येथून पुढे कुठललाही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी हमी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शेतकर्‍यांना दिली.

संपूर्ण राज्यामध्ये एक ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जातो. मात्र या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून प्रथमच संपूर्ण राज्यामध्ये महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने संगमनेर उपविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आले होते. शासकीय विश्राम गुहावर काही काळ थांबले होते. त्यावेळी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळेगाव पठार येथील शेतकर्यांनी त्यांची भेट घेत महसूल व कृषी कर्मचार्‍यांचा तक्रारींचा पाढा माजी पंचायत समिती सदस्य अजय फटांगरे यांच्यासमोर वाचला.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिलेल्या निवदेनात शेतकरी म्हटले की सन 2021-22 ला संगमनेर तालुक्या च्या पठार भागात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमध्ये माळेगाव पठार येथील अनेक शेतकर्‍यांचे कांदा व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करताना महसूल व कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांनी तोंड पाहून पंचनामे केले. त्यामुळेच आम्ही शासनाच्या अतिवृष्टीच्यामद तीपासून वंचित राहिलो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, मागणी ल्याचा आरोप माजी सरपंच बाबासाहेब भोर सचिन हुलवळे बबन भोर, महेंद्र भोर, संभाजी मोरे, रामदास भोर, रामनाथ मोरे आणि रवींद्र भोर यांच्यासह शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

SCROLL FOR NEXT