अहमदनगर

नगर : अमृतसागर दूध संघात पिचड यांचा झेंडा !

अमृता चौगुले

अकोले : पुढारी वृत्तसेवा : तालुक्याची शिखर संस्था असलेल्या अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या झालेल्या चुरशिच्या निवडणुकीत माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभव पिचड यांच्या शेतकरी विकास मंडळाने तब्बल 13 जागांवर दणदणीत विजय मिळवित महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.  अमृतसागर दूध संघाच्या संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी आज (रविवारी) शांततेत 100 टक्के मतदान होऊन मतमोजणी पार पडली. माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आ डॉ. किरण लहामटे, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर, जि. प. माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत झाली. निवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला.

अनुसूचित जाती- जमाती मतदार संघातून माजी आ. वैभवराव पिचड 130 पैकी 97 मते मिळवत विजयी झाले. शेतकरी विकास मंडळाचे अन्य विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते अशी, सर्वसाधारण मतदार संघ- आप्पासाहेब आवारी- 80, रामदास आंबरे-66,अरुण गायकर-64, बबन चौधरी – 69, सुभाष डोंगरे-73, जगन देशमुख- 66, गंगाधर नाईकवाडी -65, रावसाहेब वाकचौरे -76
महिला राखीव सुलोचना भाऊसाहेब औटी-75, अश्विनी प्रविण धुमाळ 79, इतर मागास वर्गआनंदराव वाकचौरे-81, भटक्या विमुक्त जाती- जमाती बाबुराव बेनके-75.

विरोधी शेतकरी समृद्धी मंडळाचे सर्वसाधारण गट गोरक्ष मालुंजकर 71 व शरद चौधरी 66 हे विजयी झाले. मतमोजणी केंद्रापासून विजयी मिरवणूक निघाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक सरकारी संस्था (दुग्ध) दीपक पराये यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक निबंधक सर्जेराव कांदळकर व दूध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT