संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील सायखिंडी शिवारात हॉटेल कृष्णा गार्डन जवळ महामार्गावरती विरुद्ध बाजूने आलेल्या दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण ठार झाला आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारातून कनोली येथील रहिवासी असणारे दत्तू तुकाराम वर्पे (वय 50) हे दुचाकीवरून जात असताना महामार्गावरून येणार्या दुसर्या दुचाकीनी त्यांना समोरून धडक दिली. या अपघातात वर्पे हे गंभीररीत्या जखमी झाले.
त्यांना तात्काळ घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचाराचासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले. याबाबत विक्रम वाबळे यांनी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या पर्याय देऊन पोलिसांनी अज्ञात मोटरसायकल स्वराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पो. नि. देविदास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक हे करत आहे.