अहमदनगर

घोसपुरी येथील दोन सराईत चोर जेरबंद

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील घोसपुरी येथील दोघा सराईत चोरट्यांना सुपा पोलिसांच्या पथकाने मोटारसायकल, तसेच मेडिकल दुकानातील रोख रक्कम चोरीच्या गुन्ह्यात जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत केल्या .
बापू उर्फ संग्राम साहेबराव कव्हाणे व विठ्ठल संजय घोडके (दोघे रा.घोसपुरी, ता.नगर) असे या आरोपींची नावे आहेत. पारनेर तालुक्यातील जातेगाव येथील यात्रेमधून सोमवारी (दि.10) दुपारी संजय बाळासाहेब दळवी यांची मोटारसायकल चोरी झाल्याचा गुन्हा सुपा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी पथक नेमले होते.

ही मोटारसायकल घोसपुरी येथील बापू कव्हाणे व विठ्ठल घोडके यांनी चोरली असून, ते ती घोसपुरी परिसरात वापरत असल्याची माहिती या पथकाला मिळाली. पथकाने घोसपुरी येथे जाऊन मोटारसायकल व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली. त्यावर आरोपींनी 7 एप्रिल रोजी श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील मेडिकलमधून रोख रकमेची चोरी केल्याची कबुली दिली. याबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच, आरोपींकडून यापूर्वी चोरलेल्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आरोपी संग्राम कव्हाणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात तीन , एमआयडीसी पोलिस ठाण्यात एक , कोतवाली पोलिस ठाण्यात एक आणि पुण्याच्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात एक असे सहा गुन्हे दाखल आहेत.

तर, विठ्ठल घोडके याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिस निरीक्षक गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार खंडेराव शिंदे व पोलिस नाईक संदीप पवार यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT