अहमदनगर

राहुरी : दोन अल्पवयीन मुलींचे केले अपहरण

अमृता चौगुले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील डिग्रस परिसरात दहावीचे पेपर दिल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींचे तरुणांनी अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना (दि. 25 मार्च) रोजी घडली. या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेतील एक 15 वर्षीय व एक 16 वर्षीय या दोन अल्पवयीन मुली एकाच वर्गात शिकत होत्या. त्या दोघी शनिवार (दि. 25 मार्च) रोजी दहावीचा पेपर देण्यासाठी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे गेल्या होत्या.

त्या दोघी उशीरापर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला, मात्र त्या मिळून आल्या नाहीत. पेपर दिल्यानंतर दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अज्ञात तरुणांनी त्या दोन्ही मुलींचे अपहरण केल्याचे समजले. अपहृत दोन्ही अल्पवयीन मुलींना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याबाबत खात्री झाल्यानंतर मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.

या मुलींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा रजि. नं. 327/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे, मात्र या घटनांमुळे पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT