file photo  
अहमदनगर

पाथर्डी तालुका : चाकूचा धाक दाखवून ट्रक चालकाला लुटले

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : विना नंबरच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी ट्रकला दुचाकी आडवी लावून ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटले. गुरूवारी पहाटे 4 वाजता ही घटना घडली आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सतीश विठ्ठल नन्नवरे (वय 40 रा. राशीन ता. कर्जत) असे ट्रक चालकाचे नाव असून, मुज्या उर्फ मुजीम सादीक सय्यद व पाप्या शेख (रा. चिंचपूररोड, पाथर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. नन्नवरे हे बारामती येथून ट्रकमधून भंगार माल घेऊन पाथर्डी मार्गे जालना येथे जात होते. त्यावेळी दुचीकवरून आलेल्या आरोपींनी त्यांचा ट्रक अडविला.

गाडीचा फायनान्सचा हप्ता थकल्याचे म्हणत ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. नन्नवरे यांनी गाडी निल असल्याचे म्हणत पोलिस स्टेशनला चला, असे म्हणताच आरोपींनी नन्नवरे यांना चाकूचा धाक दाखवून खिशातील पाच हजार व नन्नवरे यांच्यासोबत असलेल्या सतीश मिसाळ यांचे तीन हजार रूपये बळजबरीने काढून घेतले.

पाथर्डी येथील नगररोड चौकात आले नाकाबंदी करत असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन लिंमकर यांना ट्रक चालकाने घडलेली हकीगत सांगितली. पोलीसांनी तात्काळ एम. एम. निन्हाळी विद्यालयाजवळ जाऊन यातील आरोपी मुज्या उर्फ मुजीम सादीक सय्यद याला मोटारसायकलसह पकडले. तर, दुसरा आरोपी पाप्या शेख पळून गेला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT