Samruddhi Mahamarg 
अहमदनगर

वाहन सुरक्षेसाठी ‘समृद्धी’ वर टायर तपासणी केंद्र

अमृता चौगुले

कोपरगाव (नगर ): पुढारी वृत्तसेवा :  हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने शिर्डी व नागपूर या दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्र उभारण्यात आल आहे. समृध्दी महामार्गाच्या शिर्डी -कोपरगाव इंटरचेंज येथील टोल नाक्यावर आज (9 जून 2023) रोजी सकाळी 10.30 वाजता परिवहन आयुक्तांच्या हस्ते टायर तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे. टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा जास्तीत वाहन चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ.नगर उप प्रादेशिक परिवन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा वाहतूकीसाठी सुरू झाला आहे. समृध्दी महामार्गावरील बहुतांशी अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. त्यामुळे अशा अपघातांना प्रतिबंध बसावा, यासाठी महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सिएट लिमिटेड या टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

महामार्गावर वाहन चालवितांना टायर योग्य गुणवत्तेचे, वेग मर्यादेचे व सुस्थितीत असणे आवश्यक आहे. वाहनधारकांना सुरक्षित प्रवार करता यावा. या उद्देशाने टायर तपासणी केंद्र सुरू केले आहे. या उपक्रमात वाहनधारकांना नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरूस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण या टायर तपासणी सुविधा मोफत देणार आहे, असे पवार म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT