अहमदनगर

घोडेगावमध्ये तीन वाहनांचा अपघात

अमृता चौगुले

घोडेगाव :  पुढारी वृत्तसेवा : एका दुचाकी चालकास वाचवण्याच्या नादात एसटी महामंडळाच्या बसने एका दूध वाहतूक करणार्‍या पिकअपला जोराची धडक दिली, या अपघातात दुचाकीस्वार व दूध वाहतूक करणार्‍या पिकअप मधील चालक गंभीर जखमी झाला. ही घटना घोडेगाव येथे गुरुवारी (दि.15) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. गावातील युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून पिकअप चालकास बाहेर काढून, रुग्णालयात पाठवले. सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमींना रुग्णालयात पाठवले व वाहतूक सुरळीत केली.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच बस स्टॅन्ड घोडेगाव येथे भंगार मालवाहतूक करणारा ट्रक दुभाजकास धडकून उलटला होता. याच ठिकाणी गुरूवारी मोठा अपघात होऊन दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दैनिक पुढारीने बुधवारी (दि.14) घोडेगाव बसस्टँड जवळ स्पीडब्रेकर व दुभाजक बसविण्यासंदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती.  मागील महिनाभरात याच ठिकाणी हा पाचवा अपघात झाला असून, गतिरोधक व डिव्हायडर असते तर या अपघातांचे स्वरूप कमी झाले असते, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT