राहुरी : पुढारी वृत्तसेवा : 'अगोदर सरकारी मोजणी करून घ्या, नंतर कांदा चाळीचे काम करा', असे म्हणाल्याचा राग आल्याने 10 जणांनी तिघांना लाथा- बुक्क्यांसह काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे ही घटना घडली. पुजा केशव हापसे (वय 25 वर्षे) ही तरूणी कुटुंबासह राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे राहते. शेजारी नानाभाऊ त्रिंबक हापसे हे कुटुंब राहते. ते नेहमी रस्त्याचे कारणावरुन वाद घालतात. (दि. 4 जानेवारी) रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास 10 जन पुजा हापसे हिच्या घराकडे येणार्या रस्त्यावर कांदा चाळीचे काम करीत होते.
पुजा हापसे आईसह तेथे गेल्या. त्यांनी कांदा चाळीचा मोबाईलमध्ये फोटो काढला. तेव्हा नानाभाऊ हापसे म्हणाला, 'तू फोटो काढू नको.' यावेळी तेथे पुजा हिचा भाऊ महेश तेथे आला व त्यांना म्हणाला, 'तुम्ही सरकारी मोजनी करा, नंतरच कांदा चाळीचे काम करा,' असे म्हणाल्याचा राग आल्याने 10 जनांनी शिवीगाळ करुन लाथा- बुक्क्यांसह काठीने मारहाण केली. तुम्ही परत आमच्याकडे आलात तर मारुन टाकु,' अशी धमकी दिली. या घटनेची राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.
पुजा हापसे हिच्या फिर्यादीवरून संदीप नानाभाऊ हापसे, गोविंद गंगाधर हापसे, संभाजी एकनाथ हापसे, नितीश संभाजी हापसे, दिनेश संभाजी हापसे, नानाभाऊ त्रिंबक हापसे, त्रिंबक गोविंद हापसे, सोमनाथ रावसाहेब हापसे, सविता सोमनाथ हापसे व कल्याणी दीपक हापसे (सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी) या दहाजणांविरुद्ध मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो. नि. घनःश्याम डांगे करीत आहेत.