एकाच 'स्पॉट' वर तीन अपघात File Photo
अहमदनगर

Accident Case | एकाच 'स्पॉट' वर तीन अपघात

पुढारी वृत्तसेवा

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शनिवारी (दि. १४) रात्री एक ते पहाटे पाचच्या सुमारास एकाच 'स्पॉट'वर तीन अपघात घडल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातामध्ये चौघे गंभीर जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पांढरी पूल परिसरातील अपघातांची मालिका थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री एकच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने समोर चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली.

धडक एवढी जोराची होती की ट्रकच्या केबिनचे संपूर्ण नुकसान झाले. या अपघातात चालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. दोघेही परराज्यातील असून, अपघातानंतर चालक केबिनमध्ये अडकला होता.

शिवराज काळे, अक्षय काळे, अतुल भवार, आदिनाथ काळे, सोमनाथ हारेर, बाबासाहेब जरे, संदीप टिमकरे या तरुणांनी मोठ्या प्रयत्नाने चालकास बाहेर काढले. ट्रकचालक अमित कुमार कत्रल (रा. जानदपूर, तमिळनाडू), तसेच अरुणकुमार भोस (रा. शिवगंगा, तमिळनाडू) हे दोघे जखमी झाले.

जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकने पेट घेतला होता. परंतु तत्परतेने आग विझविण्यात आली. त्यानंतर अग्निशामन दलातर्फे आग आटोक्यात आणण्यात आली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुमारे तीनच्या दरम्यान अपघातग्रस्त ट्रकलाच कंटेनरने जोराची धडक दिल्याने कंटेनर शेजारील अमित हार्डवेअर या दादासाहेब बडे यांच्या मालकीच्या दुकानात शिरला. यामध्ये कंटेनर चालक अमीन हरून (रा. हरियाणा) गंभीर जखमी झाला. दुकानाचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे दोन अपघात घडले असतानाच पहाटे पाचच्या सुमारास भाजीपाला घेऊन जाणारा मालवाहतूक टेम्पो त्याच अपघातग्रस्त ट्रकला धडकून पलटी झाला. यात टेम्पोचालक अंबादास गायकवाड (रा. मिरी माका) जखमी झाला आहे. चार तासांच्या आत एकाच ठिकाणी तीन अपघात घडून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

गेल्या चार दिवसांतील पांढरीपूल परिसरातील हा सहावा अपघात आहे. अपघातानंतर काही वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सोनई पोलिस स्टेशनचे कर्मचारी व महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस हेडकॉन्स्टेबल मच्छिंद्र आडकित्ते, गावडे, पोलिस नाईक बाचकर, पोलिस कॉन्स्टेबल तमनर, पवार, गर्जे, बोरुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

या परिसरात वारंवार अपघात होत असून, अनेक वर्षांपासून पंचक्रोशीतील नागरिकांकडून अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पांढरीपूल परिसरातील अपघातात अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. घाट परिसरात पोलिस चौकी, झेब्रा क्रॉसिंग पट्टे, सूचनाफलक, सिङ्गल लाईट, उतार कमी करणे, महामार्गावर ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावणे अशा व इतर उपाययोजना तत्काळ करण्याची गरज आहे.
आदिनाथ काळे, सामाजिक कार्यकर्ते
पांढरीपूल पंचक्रोशीतील ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. वारंवार दररोज अपघात घडत असून, कारवाई होत नाही. वारंवार मागणी करूनही त्याकडे संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. प्रशासनाने ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात कफयुक्त खोकला घशातील खबर 10/- घसा दुखणे ह्यावर गुणकारी याव्यात.
सोमनाथ हारेर, माजी सरपंच, खोसपुरी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT