अहमदनगर

नगर : दीपाली सय्यदच्या तक्रारदाराला धमकीचे पत्र

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : दीपाली सय्यद यांच्या बाबत असलेले पुरावे व तक्रार मागे घे, नाहीतर गोळ्या घालून ठार मारेन, तुझे घर बरबाद करेल, अशा धमकीचे निनावी पत्र दीपाली सय्यद यांचे तत्कालीन स्वीय सहायक भाऊसाहेब रामदास शिंदे यांना आले आहे. त्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविला आहे.

भाऊसाहेब शिंदे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे राहतात. शुक्रवारी (दि.6) सकाळच्या सुमारास त्यांच्या घरासमोर निनावी पत्र येवून पडले होते. अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमध्ये हजारो कोटींचा घोटाळा व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद याच्या बरोबर आर्थिक संबंध याबाबतचे पुरावे मीडियाला व मंबई पोलिस आयुक्तांना दिल्याने तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याशी दीपाली सय्यद यांचे साटेलोटे उघड केल्यास गोळ्या घालून मारण्याची धमकी पत्रातून देण्यात आली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात अदखपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT