संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असणार्या यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल संगमनेर पंचायत समितीला नाशिक विभागस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. संगमनेर पंचायत समितीला दोन महिन्यापूर्वी जिल्हास्तरीय आणि एक महिन्यापूर्वी नाशिक विभागस्तरीय पंचायतराज अभियान समितीच्या अधिकार्यांनी पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभाग, बांधकाम, ग्रामपाणीपुरवठा, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण, आरोग्य, महिला बालक ल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि, समाज कल्याण, विभाग तसेच शाश्वत विकास ध्येय या विभागांची पाहणी केली होती.
नाशिक विभागस्तरीय समितीने 2021 ते 22 या वर्षांतील कामगिरीच्या आधारे मुल्यांकन करून 400 गुणांची प्रश्नावली तयार केली होती. त्यात पंचायत समितीचा 400पैकी 328.42 गुणांकन प्राप्त झाला असून नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अ. नगर या पाच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून संगमनेर पंचायत समितीने सहा लाख रुपयांचे बक्षीस मिळविलेले आहे. एप्रिल महिन्यात पंचायतराज दिनाच्या दिवशी मुंबईतील एका कार्यक्रमात संगमनेर पंचायत समि तीला सहा लाख रुपये रोख सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्रदेऊन गौरविण्यात येणार आहे.हा पुरस्कार मिळाल्याने पंचायत समितीच्या कर्मचार्यांचे कौतुक होत आहे.
सर्वांच्या कामांमुळेच पंचायत समितीला बक्षीस
संगमनेर पंचायत समितीतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांनी सामाजिक जाणिवेतून काम केल्यामुळेच हे बक्षीस मिळाले आहे. यापुढे अधिक लोकाभिमुख कारभार करत सामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यावर भर दिला जाईल. या यशात पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सहभाग राहिला असल्याचे संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी दैनिक 'पुढारी'शी बोलताना सांगितले.