अहमदनगर

चाकूचा धाक दाखवून तीन लाखांची चोरी

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुक्यातील मांडवे येथे काल मध्यरात्री चोरट्यांनी दोन महिलांना चाकूचा दाखवून सोन्याचे साडेचार तोळे दागिने व रोख 22 हजार रुपये असा 3 लाखांचा ऐवज लंपास केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. मांडवे येथील मारुती तुळशीराम निमसे हे काल रात्री साडेबारा वाजता शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले होते. घरात महिलाच असल्याचे पाहून चार चोरट्यांनी घराचे कंपाऊंड, सेफ्टी दरवाजा व स्वयंपाक घराच्या दरावाजांची कुलपे तोडून आत प्रवेश केला. घरातील दोन महिलांना चाकूचा धाक दाखवून घरात ठेवलेला व अंगावरील सोन्याचा ऐवज व रोख रक्कम मुकाट्याने काढून द्या, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देत सोन्याचे साडेचार तोळे दागिने व रोख 22 हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. त्यानंतर या महिलांनी आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावत आले.

या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मारज श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले.
या पथकाने साकत रस्त्यावरील मळगंगा देवीच्या मंदिरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. परतु चोरटे तेथून पुढे दुचाकीवर पसार झाले. या चोरीनंतर गावात दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन चोरट्यांची माहिती घेतली. याबाबात नगर तालुका पोलिस ठाण्याचा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस गस्त त्वरित सुरू करा
दरवर्षी दिवाळी सणाच्या काळात मांडवे परिसरात चोरटे धुमाकूळ घालतात. कालही चोरट्यांनी घरात महिलाच असल्याचे पाहून डाव साधला. परिसरात पोलिसांनी गस्त सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT