अहमदनगर

नगर : हल्ला करीत बिबट्याने केली कालवड फस्त

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  बिबट्याने कालवड फस्त केल्याची घटना येथील खडकी शिवारात जुन्या टाकळी रोडलगत पांढरे वस्ती येथे घडली. परिसरात बिबट्याचा संचार वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. खडकी शिवारात जुन्या टाकळी रोडलगत पांढरे वस्ती आहे. येथे अंबादास माधवराव आढाव यांच्या मालकीच्या तीन गाया व कालवड तारेच्या कुंपणाच्याआत दावणीला बांधलेले होते.

सोमवारी (दि.13) रात्री उशिरा बिबट्याने कालवडीवर हल्ला चढविला. 8 महिन्यांच्या गीर कालवडीला तारेच्या कंपाउंडबाहेर ओढून नेत फस्त केले. सकाळी आढाव शेतात दूध काढण्यास गेल्यावर ही घटना लक्षात आली. वन विभागास माहिती दिल्याने कर्मचारी देवराम जाधव यांनी पंचनामा केला. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा,नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. टाकळी येथे बिबट्याने सचिन देवकर यांच्या वस्तीवर कुत्र्यावर हल्ला केला होता.

SCROLL FOR NEXT