नगर : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वसुली पथकाने मंगळवारी थकीत कर मालमत्ताधारकांचे नळ कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई केली. लाखो रुपयांची थकबाकी असलेल्या नऊ मालमत्ताधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मंगळवारी वॉर्ड क्रमांक 65 मधील तुळशीराम सीताराम कांबळे, महाकालेश्वर हाउसिंग सोसायटी घर नंबर 200, महाकालेश्वर हाउसिंग सोसायटी घर नंबर 187, महाकालेश्वर हाउसिंग सोसायटी घर नंबर 172, महाकालेश्वर हाउसिंग सोसायटी घर नंबर 190, संत नामदेव को-ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी घर नंबर 127, संत नामदेव को-ऑपरेटिंग हाउसिंग सोसायटी घर नंबर 124, चन्ना रमेश राधाकिसन आदींकडे थकबाकी असल्याने सर्वांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. वॉर्ड 25 मधील मालमत्ताधारक गणपत गजाबा आव्हाड (रा. कायनेटिक चौक, बुरूडगाव) यांच्याकडे थकबाकी असल्याने मालमत्ता सील केली.
मोबाईल टॉवरला टाळे
महापालिका कर वसुली पथकाने लाखो रुपयांच्या थकबाकीपोटी मंगळवारी खासगी मोबाईल कंपन्यांचे टॉवर सील केले. भारत संचार निगम, सेंच्युरी इन्फ्रा टेली या कंपन्यांचे टॉवर आहेत.