अहमदनगर

नगर : सुप्यातील काळे टोळी हद्दपार ; पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचा दणका

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा : सुपा परिसरात वारंवार गुन्हे करणार्‍या सराईत काळे टोळीला पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगार व गुन्हेगारी उघडून फेकण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी गुन्हेगारांची कुंडली तयार करून प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका सुरू केला आहे. टोळीप्रमुख आदिक अजगण काळे (वय 46) याच्यासह टोळीतील सदस्य पिंटी आदिक काळे (वय 35), समीर आदिक काळे (वय 22, सर्व रा. म्हसणे, ता. पारनेर जि. अहमदनगर) या तिघांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घातक शस्त्रे बाळगून मारहाण करणे, धमकावणे, शिवीगाळ करणे, गंभीर दुखापत करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे, ठार मारणे, फसवणूक करणे असे गंभीर गुन्हे या टोळीवर दाखल आहेत. संघटित गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी पोलिस अधीक्षक ओला यांनी काळे टोळीला हद्दपारीचा दणका दिला आहे. पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध मोठी मोहीम उघडली आहे. दहशत पसरविणार्‍या कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करून पोलिसांनी आपले मनसुबे जाहीर केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारांमध्ये 'खाकी'ची दहशत निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे..

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT