अहमदनगर

माझ्या लेकराला वाचवा! आईने लेकराला वाचवण्यासाठी फोडला टाहो; पोलीस ठरले देवदूत

backup backup

अकोले, पुढारी वृत्तसेवा : स्वतःच्या डोळ्यासमोर आपला मुलगा रंधा धबधबाच्या पाण्यात वाहत जात होता. पाण्याने आक्राळ विक्राळ रुप धारण केले होते. अशा परिस्थितीत वाचवा.. वाचवा.. वाचवा….. माझ्या संचितला…. माझ्या लेंकराला वाचवा! अशी आर्त हाक देणा-या सिमा सोनटक्के या आईने मोठा टाहो फोडला. यानंतर पोलीसांनी दोरीच्या सहाय्याने संचितला वाचवले आहे. लेकराला वाचवण्यासाठी टोहो फोडणाऱ्या आई आणि मुलासाठी पोलीस देवदूत ठरले आहेत. संचितला बाहेर काढल्यावर संचितची आई सिमा व संचित यांनी देवदुतांचे ऋण व्यक्त करत अश्रूंना वाट करुन दिली.

पावसाचे आगर असलेल्या प्रवरा पाणलोट क्षेत्रात पावसाची चाहूल लागली की निसर्गप्रेमींची पावले डोंगर दऱ्यांच्या कोसळणाऱ्या धबधबे तसेच भंडारदरा, घाटघर, रतनगड, रंधा धबधबा या पर्यटन स्थळाच्या दिशेने वळतात. कधी रिमझिम पावसाच्या सरी तर कधी धुक्याची झालर असा हा नजारा असतो. सतत स्पर्धात्मक व धकाधकीच्या जगात वावरणारी माणसे निसर्गाच्या कुशीत एक दिवस रमण्याचा अविस्मरणीय अनुभव घेण्यासाठी पावसाळ्यात पर्यटक स्थंळाला भेट देतात.

दरम्यान शासकीय सुट्ट्या असल्याने १५ ऑगस्ट रोजी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सुट्टी असल्याने भंडारदरा, रंधा परिसरात आई सीमा सोनटक्के सोबत आपला १२ वी त शिकणारा संचित केदारनाथ सोनटक्के (वय १७ , रा.नाशिक रोड) हा फिरावयास आला होता. तर रंधा धबधबा परिसरात पर्यटक आनंद लुट असताना संचितलाही आपला आनंद लुटण्याचा मोह आवरता आला नाही.

तो घोरपडा मातेच्या मंदिरासमोरील प्रवरा नदीपात्रात आईसह काही मैत्रिणी फोटो घेत होता. परंतु, संचित पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात संचितचा पाय घसरल्यामुळे प्रवरा नदी दुधडी भरून वाहत असल्याने आईने मदतीसाठी टाहो फोडला. नशीब बलवत्तर संचितचा पाय अचानक रंधा पाण्यातील दगडाला अडकला. मध्यभागी असलेल्या दगडावर संचित पाण्यातून वाट काढत स्थिरावला. यानंतर होमगार्ड रामदास पटेकर, दत्तू जाधव यांनी राजुर पोलीस स्टेशनची संपर्क साधून झालेली घटना सांगितले.

तात्काळ राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे हे काही मिनिटातच रंधा येथे आले. रंध्धा फॉलवर प्रवरा नदीत दगडाचा आधार घेत अडकलेला संचित सोनटक्के याला रिस्की ऑपरेशन करून एक झाडाला बांधून दुसरा दोराचे टोक संचितकडं फेकले संचितने आपल्या कमरेला दोर बांधून देवदूत ठरलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, पो.काँ. अशोक गाडे, दत्तू जाधव, विजय वेडे, रोहिदास वेडे, वसंत भोईर यांनी अलगत संचित ला दोराच्या साह्याने बाहेर काढले आणि संचिताचा जीव वाचविण्यात राजूर पोलिसांना यश आले.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT