अहमदनगर

कबड्डी स्पर्धेत नगर पुरुष संघाची विजयी सलामी !

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  वरिष्ठ गट पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान नगरच्या पुरुष संघाने विजयी सलामी दिली. 'अ' गटाच्या पहिल्या सामन्यात नगरने हिंगोलीला 67-20, असे पराभूत करत साखळीत पहिल्या विजय नोंदविला. तर, पुणे, कोल्हापूरच्या महिल संघ, मुंबई शहर, नंदुरबार, उस्मानाबाद पुरुषांच्या संघाने विजय मिळविला.  अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या विद्यमाने वाडिया पार्कवर मॅटच्या मैदानात आजपासून राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यजमान नगरला आज संमिश्र यशाला सामोरी जावे लागले.

मध्यांतराला 34-12, अशी आघाडी घेणार्‍या गतविजेत्या नगरने उत्तरार्धात अधिक जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक पार केले. आदित्य शिंदे, सौरभ राऊत यांच्या धारदार चढाया त्याला शंकर गदई, संभाजी वाबळे यांची मिळलेली पकडीची साथीमुळे हा विजय सहज शक्य झाला.  नगरच्या महिलांना मात्र 'इ' गटात कोल्हापूरकडून 47 -20, असा पराभवाला सामोरे जावे लागले. स्नेहल शिंदे, प्रीती करवा यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाने कोल्हापुरने ही किमया साधली. नगरची ऋतुजा टिक्कल बरी खेळली.

नगरच्या पुरुष संघ मैदानात विजयाच्या हेतून उतरला होता. सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मजबूर केली होती. संघाने प्रो-लीग खेळणारे खेळाडू शंकर गदई, आदित्य शिंदे, राहुल धनवटे, राहुल खाटिक, सौरभ राऊत, संभाजी वाबळे व अजित पवार या प्रमुख खेळाडूंना मैदानात उतरवले होते. संघाचे प्रशिक्षक शंतनू पांडव यांचे मार्गदर्शन लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT