अहमदनगर

नान्नज : डीपी बदलली रे.. बदलली की जळते.!

अमृता चौगुले

नान्नज : पुढारी वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील घोडेगाव येथील गावठाणसाठी असणारी डीपी (ट्रान्सफार्मर) दोन-तीन वेळा बदलूनही पुन्हा जळत आहे. डीपी जळाल्याने पहिल्यांदा दुसरीकडील डीपी आणून बसविण्यात आली..तीही जळाली. यानंतर पुन्हा तिसर्‍या दिवशी डीपी बसविण्यात आली, तीही काही तासातच जळाली…म्हजणे परिसरातील घरांमध्ये पुन्हा अंधार! दोन ते तिनवेळा डीपी बसवूनही ती जळत असेल, तर अनेक प्रश्न चिन्ह निर्माण होतो. यामुळे नागरिकांना गेल्या सहा दिवसांपासून अंधारात जीवन जगण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने येथे लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आजी-माजी सरपंचासह नागरिकांनी केली.

घोडेगाव येथील गावठाणसाठी असणारी डिपी सहा दिवसांपूर्वी जळाली आहे. यानंतर दोन दिवसांनी घोडेगाव येथील डीपी भरून न देता इतर ठिकाणची डीपी या ठिकाणी बसवण्यात आली. ही काही तासातच जळाली. पुन्हा तिसर्‍या दिवशी येथे दुसरी डीपी बसवण्यात आली; मात्र हेही काही वेळातच जळाली. बसविलेला डीपी तत्काळ नादुरुस्त होतो कसी? असा प्रश्न नागरिकांना पडला असून, डीपी व्यवस्थित भरून दिली जाते की, नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. येथील नागरिकांचे जनजीवन विजे आभावी विस्कळीत झाले आहे.घोडेगाव येथील गावठाणची डीपी तत्काळ बदलून येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

 सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात जागोजागी गवत उगवले असून, घाणीचे साम्राज्य आहे. यामुळे डासांची उत्पत्तीही मोठ्या प्रमाणात झाली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच वीजपुरवठा खंडित असल्याने मोठी भर पडली असून, संपूर्ण जामखेड तालुक्यात वीजेच्या बिघाडात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, ग्राहक मोठे त्रस्त आहेत.

SCROLL FOR NEXT