अहमदनगर

‘समाजकल्याण’च्या पुरस्कारांवर नगरचा वरचष्मा !

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 25 व्यक्ती, सामाजिक संस्थांना शासनाकडून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त संस्थांमध्ये डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचाही समावेश आहे. लवकरच मुंबई येथे पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी दिली. राज्यात विविध क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांचा सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामुळे शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार दिला जातो.

हा पुरस्कार दि फे्रंड्स ऑफ डिप्रेस्ड लीग, शेवगाव या संस्थेला मिळाला आहे. संजय खामकर यांना संत रविदास पुरस्कार दिला जात आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्काराने दिनकर सकट, पोपटराव साठे, ज्ञानदेव राक्षे, विश्वनाथ आल्हाट, सुनील सकट, पोपट भानुदास पाथरे, सुरेश साठे, हिराबाई दत्तू गोरखे, प्रकाश सखाराम साळवे यांना गौरविण्यात येणार आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारात संस्थांमध्ये विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन, तर व्यक्तींमध्ये कांतीलाल जाडकर, शरद तपासे, रावसाहेब झावरे, विजय जगताप, सुनील साळवे, परिमल निकम, बाबासाहेब शेलार, राधेलाल नकवाल, संपतराव भारूड, राजेंद्र घोडके, दत्ता विघावे, बेबीताई अशोक गायकवाड, अशोक बागूल यांचा समावेश आहे.

पुरस्कारार्थींची प्रत्यक्ष भेट

समाजकल्याण सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी जिल्ह्यातील 25 पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्थांचे संचालक यांचे थेट घरी जाऊन स्वागत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी 25 नोडल अधिकारीही त्यांनी नेमले आहेत. स्वतः देवढे यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनचे संचालक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेवून अभिनंदनही केले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT