अहमदनगर

पाथर्डी : निवडुंगे ग्रामपंचायतीची निविदा प्रक्रिया अखेर रद्द

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील निवडुंगे ग्रामपंचायातीने विविध विकास कामांसाठी 32 लाख रूपयांची निविदा काढली होती. ती पंचायत समितीने रद्द केली आहे. निवडुंगे ग्रामपंचायतीने 32 लाख रूपये नवीन कामाच्या निविदा प्रक्रिया नियमबाह्य केल्याने त्या रद्द कराव्यात, या मागणीसाठी माजी सरपंच आसाराम ससे यांनी पाथर्डी पंचायत समितीसमोर उपोषण केले.

या नवीन कामांच्या निविदा प्रक्रियेबाबत चौकशी करून त्यावर कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांनी दिल्यानंतर ससे यांनी उपोषण मागे घेतले होते त्यांनतर निवडुंगे ग्रामपंचायतीने 32 लाख रूपये कामाची निविदा प्रक्रियेबाबत चौकशीनंतर निविदा रद्द करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पालवे यांनी दिले. दरम्यान, ग्रामसभेत माझ्याविरूद्ध खोटी माहिती देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या आदेशाने माझा विकासाला विरोध नाही, तर विकासाच्या नावाखाली गैरव्यवहार करणार्‍यांना विरोध आहे, हे सिद्ध झाले, असे माजी सरपंच आसाराम ससे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT